sant sevalal maharaj information in marathi : भारतामध्ये जवळपास 14 कोटीहून अधिक बंजारा समाज आहे. बंजारा समाज्याची एक स्वतंत्र बोली आणि भाषा आहे. बंजारा समाज हा एकमेव असा समाज आहे जो भारतामधील प्रत्येक राज्यामध्ये आढळून येतो. याच बंजारा समाजाचे कुलदैवत म्हणून sant sevalal maharaj information in marathi महाराजांना ओळखले जाते. सेवालाल महाराजांना आदराने लोकं “ सेवा भाया ” देखील म्हणतात .
संत सेवालाल महाराजांचा जन्म आंध्रप्रदेशातील जिल्हा अनंतपुर ,तालुका गुठी , गोलाल डोडी या गावात 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला. हा दिवस बंजारा समाज मोठ्या उत्सहाने sevalal maharaj jayanti म्हणून साजरा करतो .(sevalal maharaj information in marathi) सेवालाल महाराजांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक होते .सेवालाल महाराज हे नाईक कुळातील होते . नाईक म्हणजे सर्व सामाज्याची ,आपल्या गावाची ,तांड्याची जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. महाराजांच्या आईचे नाव धरमंणीमाता ( याडी) होते. “याडी” या शब्दाचा आर्थ म्हणजे ” आई”. भारतामध्ये अनेक सामाज्याचे साधू संत होवून गेले त्यांनपैकी एक म्हणजे संत सेवालाल महाराज होय .भारतामध्ये सिंधू संस्कृती हि एक सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते , बंजारा समाजही या संस्कृतीच्या संबधित, संस्कृती जपणारा समाज असल्याने हा गोर-बंजारा समाज एक आदर्श ,कष्टाळू समाज म्हणून ओळखले जाते . बंजारा समजा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गाव ,तांडा ,वस्त्या वर वसलेला आहे. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो . महाराष्ट्रामध्ये हा समाज “बंजारा” याच नावाने ओळखला जातो तर कर्नाटक मध्ये लमाणी , आंध्रप्रदेशामध्ये तल्लाडा ,पंजाबमधील बाजीगर यासारख्या विविध नावाने ओळखला जातो .
sant sevalal maharaj information in marathi
संत सेवालाल महाराज यांना तीन भावू होते त्यांची नावे ” हाफा नायक , बदू नायक ,व पुरा नायक आशी होती .सेवालाल महाराजांच्या वडिलांकडे एकूण 52 तांड्याची नायकी होती ,पशुपालन करणे व एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तेथील राज्यांना / सम्राटानां अन्नधान्य (रसद) व इतर वस्तूंची दळणवळण बंजारा समाज करायचा . इंग्रज व मुघल यांचे अत्याचार पण या समाजाने सहन केलेले आहेत . भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील अनेक बंजारा योध्यांनी आपले प्राणाची बाजी लावली आहे .sevalal maharaj information in marathi
पोटाची खळगी भरण्यासाठी वन-वन फिरणाऱ्या समाजाला जगण्याचा मार्ग सेवालाल महाराजांनी दाखवला. सेवालाल महाराज विमुक्त भटक्या जातीत मोडणाऱ्या प्रत्येक बंजाराचे आराध्यदैवत आहेत . सेवालाल महाराजांनी दिलेल्या उपदेशांचे पालन बंजारा समाज आजपर्यत करत आहेत . पूर्वीपासून चालत आलेली संस्कृती जपताना बंजारा समाज दिसतो .
sevalal maharaj information in marathi
🚩संत सेवालाल महाराजांचे वडील :
सेवालाल महाराजांचे अजोबांचे नाव रामजी नायक होते त्यांचा मुलगा म्हणजे सेवालाल महाराजांचे वडील भीमा नायक हे एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील राजांना / सम्राटानां अन्नधान्य पोहोचवण्याचा व्यापार करत असत . यामुळे भीमा नायक यांना सर्व भाषा ज्ञान होते .त्यांच्याकडे सुमारे 3000 ते 4000 गुरे ढोरे होती त्यांचा वापर ते माल वाहतुकीसाठी करत . प्रत्येक तांड्यातील व्यक्तींची संख्या 450 ते 500 पर्यंत होती व त्या 500 लोंकानवर मुकादम म्हणून एका स्त्री व पुरुषाची नेमणूक मुख्य नाईक यांच्या मार्फत केली जायची,भीमा नायक हे एकून 52 तांद्यांचे प्रमुख होते म्हणून त्यांनी एकूण 52 पुरुष व्यक्ती ( भेरू ) व स्त्रिया (जोगानी ) यांची उपदेशक (मुकादम )म्हणून नेमणूक केली होती .
🚩संत सेवालाल महाराजांचे आई :
संत सेवालाल महाराजांच्या आई चे नाव धरमणी असे होते . भीमा नायक आणि धरमणी यांच्या लग्नानंतर जवळपास 12 वर्षे मूल बाळ नवते त्यानंतर भीमा नायक यांनी जगदंबा मातेची पूजा,तपस्या केल्याने मातेच्या कृपेने संत सेवालाल महाराजांचा जन्म झाला असे म्हंटले जाते .
🚩sant sevalal maharaj information in marathi : संत सेवालाल महाराज यांचे लग्न
संत सेवालाल महाराज हे भ्रमचारी होते ,त्यांचे लग्न झाले नवते त्यांचे म्हणने होते कि समाजातील सर्व स्त्रिया मला भाऊ म्हणून हाक मारतात मग मी लग्न कोणाशी करू .
😊 हेही वाचा 👉 छत्रपती शिवाजी महाराज शिवगर्जना मराठीमध्ये 👈
sant sevalal maharaj information| सेवालाल महाराजांनी यांचे वचन
✅ खरेरो मार्ग पकडो | ( अर्थ : सत्याचा मार्ग धरा )
✅ रपया कटोरो पाळीं वक जाय | ( अर्थ : रुपयाला एक वाटी पाणी विकले जाईल )
✅ केणी भजो पूजो मत | ( अर्थ : कोणाची पूजा करत बसू नका देव दगडात नाही माणसात, पाण्यान मध्ये आहे )
✅ जीवते धानिरो बीर मत लावो| ( अर्थ : ज्या स्त्रीचा पती जिवंत आहे आश्या स्त्रीला बायको म्हणून घरी आणू नका)
✅ कसाईन गावधी मत वेचो | (अर्थ : पैसा मिळवण्यासाठी खटीकला गाय विकू नका ).
✅ जाणंजो छाणंजो पच मांणंजो | ( अर्थ : एखादी गोष्ठ जाणून घ्या ,त्याचा विचार करा सत्यता पडताळा मगच मान्य करा. )
✅ सत्यधर्म लीनताती रेणुं |, सदा सांसी बोलणुं | , हर वातेन सोचं संजन केवणुं |, भवसागर पार करलेणुं | ( अर्थ : सत्य हाच धर्म आहे , सदैव चांगले बोला ,प्रत्येक दोष्ठ समजून घ्या ,बोलताना कोणाच्या भावना दुखवू नका )
sant sevalal maharaj | सेवालाल महाराज यांची शिकवण
- पशू-पक्षी ,पर्यावरणाचे यांचे संरक्षण करा .
- देव हा दगडात नाही तर माणसात आहे माणुसकीने वागा .
- माणुसकीवर प्रेम करा .
- महिलांचा आदर करा .
- कोणाची निंदा करू नका .
- खोटे बोलू नका
- स्त्री – पुरुष यामध्ये भेदभाव करू नका .
- गायी ला खाटीकास विकू नका.
sevalal maharaj death date | सेवालाल महाराजांचा निधन
😌😥 4 डिसेंबर 1806 रोजी संत सेवालाल महाराजांचे श्रीक्षेत्र रुईगड येथे निधन झाले . पोहरागड येथे सेवालाल महाराजांची समाधी आहे. जवळच जगदंबा मातेचे मंदिर देखील आहे. सेवालाल महाराजांनी शेवट पर्यंत आपल्या समाज्याला चांगला उपदेश देण्याचे काम केले . आपल्या समाजप्रबोधनातून नवीन दिशा देण्याचे काम केले . त्यावेळी महाराजांनी केलेल्या काही भविष्यवान्या आयुष्यात खऱ्या ठरताना आपल्याला दिसतात sant sevalal maharaj information in marathi .
I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.