pm vishwakarma yojana in maharashtra: पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र.
pm vishwakarma yojana in maharashtra: पी एम विश्वकर्मा योजना ( pm vishwakarma yojana ) हि 17 सप्टेंबर 2023 ला सुरु करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत सोनार ,लोहार ,शिंपी ,कुंभार,मूर्तिकार,मासे मारी जाळ बनवणारे, खेळणी बनवणारे यासारख्या एकूण 18 प्रकारच्या पारंपारिक कौशले असणाऱ्या व व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हि योजना भारत सरकार मार्फत सुरु करण्यात आली आहे .
pm vishwakarma yojana in maharashtra |पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र
योजनेचे नाव | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (pm vishwakarma yojana) |
योजना कधीपासून सुरु झाली | 17 सप्टेंबर 2023 |
योजना कोणी सुरु केली | प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी |
योजनेचे बजट किती आहे | 13000 करोड |
लाभार्थी | पारंपारिक कौशले असणाऱ्या लोकांसाठी (उदा .सोनार ,लोहार ,सुतार ,मूर्तिकार ,कुंभार व इतर एकूण 18 प्रकारचे कौशले असणारे ) pm vishwakarma yojana in maharashtra |
योजनेचा लाभ | पारंपारिक कौशले बाळगणाऱ्या व्यक्तींना मोफत प्रशिक्षण देणे व त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत करणे .आणि व्यवसायासाठी लागणारे अत्याधुनिक मशीन ,टूल कीट देणे . |
योजनेची अधिकृत वेबसाईट | https://pmvishwakarma.gov.in/ |
संपर्क क्रमांक (pm vishwakarma yojana helpline no ) | 18002977777 आणि 17923 |
pm vishwakarma yojana in maharashtra benefits in marathi |पी एम विश्वकर्मा योजना महाराष्ट्र योजनेचे फायदे.
- सरकारी मान्यता मिळणार : pm vishwakarma yojana in maharashtra या योजनेमध्ये नोंदणी केल्या नंतर पारंपारिक कौशले असणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून अधिकृत प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार यामुळे त्यांची विश्वकर्मा म्हणून एक नवीन ओळख या मार्फत होईल.
- प्रशिक्षण व मानधन मिळणार : विश्वकर्मा योजनेमध्ये नोंदणी केल्यानंतर ज्या व्यक्तीकडे जश्या प्रकाची पारंपारिक कौशले आहे त्या प्रकारचे प्रशिक्षण सरकारकडून देण्यात येईल . सुरवातीला 5-7 दिवसाचे ( 40 तास ) प्रशिक्षण तालुका स्थरावर देण्यात येईल. त्यानंतर इच्छुक उमेदवार 15 दिवसाचे जिल्हा स्थरीय प्रशिक्षण घेण्यासाठी देखील भाग घेवू शकतात. प्रशिक्षण घेण्याच्या कालावधीत प्रती दिवस 500 रुपये मानधन सरकार मार्फत दिले जाईल.
- टूलकीट मिळणार : टूलकीट खरेदी करण्यासाठी सरकारकडून 15000/- रुपये चे अनुदान मिळणार.
- व्यवसाय वाढीसाठी आर्थिक सहाय्य : पहिल्या टप्यामध्ये 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाईल व त्याच्या परतफेडीचा कालावधी 18 महिन्यांचा असेल .त्यानंतर दुसऱ्या तप्यामध्ये 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाईल व त्याच्या परतफेडीचा कालावधी हा 30 महिन्यांचा असेल. या आर्थिक सहाय्य रकमेवर फक्त 5% वार्षिक व्याजदर द्यावा लागेल. आर्थिक सहाय मंजुरीसाठी लागणारे शुल्क भारत सरकार मार्फत दिले जाईल.
- डिजिटल पेमेंट घेवाण-देवाणसाठी प्रोत्साहन: डिजिटल पेमेंट पद्धतींचा वापर करून पैशांचे व्यवहार केल्यास प्रती व्यवहारावर 1/- प्रोत्साहन म्हणून दिले जाणार.
- व्यवसाय वाढीसाठी सहाय्य: व्यवसाय वाढवण्यासाठी ब्रँडिंग व मार्केटिंगची मदत व ई- कॉमर्स वेबसाईटवर साहित्य विकणे इत्यादी प्रकारची मदत देखील करण्यात येईल.
👉 हेही वाचा महिलांना हजारो रुपये कमवण्याची संधी, 8 लाख रुपये अनुदान 👈
pm vishwakarma yojana eligibility criteria | योजनेसाठी पात्रता काय आहे.
- उमेदवार हा वय 18 वर्षे पूर्ण व असंघटीत क्षेत्रातील हाताने किंवा आवजाराने काम करणारा व योजने अंतर्गत येणाऱ्या 18 प्रवर्गापैकी असावा.
- उमेदवाराने नोंदणीपूर्वी ( 5 वर्षापूर्वी ) केंद्र सरकारच्या मुद्रा लोन ,पी एम स्वनिधी अश्या इतर लोन योजनां मार्फत कर्ज घेतलेले नसावे.
- या योजनेसाठी कुटुंबातील एकाच व्यक्ती पात्र असेल.
- सरकारी नोकरदार कुटुंबातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसतील.
PM Vishwakarma will empower our traditional artisans and craftspeople. pic.twitter.com/7k0YRyZTYf
— PMO India (@PMOIndia) October 19, 2023
pm vishwakarma yojana online registration : अर्ज नोंदणी प्रकिया
pm vishwakarma yojana योजने मध्ये नोंदणी करण्यासाठी तुम्हाला https://pmvishwakarma.gov.in/ या वेबसाईटचा वापर करावा लागतो,त्यासाठी तुम्हाला जवळच्या CSC (Common Service Centres) वर जावून खाली दिल्याप्रमाणे नोंदणी प्रक्रिया करावी लागेल.
pm vishwakarma yojana documents | कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल क्रमांक
- ई -मेल
- व्यवसायाचा पुरावा ( असल्यास )
- बँक पासबुक
- कलर फोटो
- जात प्रमाण पत्र
👉🌍 Website 🌍 👈
- स्टेप 1: मोबाईल व आधार चे वेरीफिकेशन करावे.( aadhaar card mobile number verification) त्यानंतर आधार चा वापर करून ( e kyc ) करावी.
- स्टेप 2 : स्वतःची विचारलेली पूर्ण माहिती भरून ( artisan registration form ) फॉर्म सबमिट करावा.
- स्टेप 3 : विश्वकर्मा प्रमाणपत्र (PM Vishwakarma certificate ) व (Digital ID ) आय डी कार्ड डाउनलोड करावे.
- स्टेप 4: यानंतर तुम्ही योजनेचा लाभ घेवू शकता .
हेही वाचा👉📲 हरवलेला मोबाईल कसा शोधावा. 👈

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.