Pan card Aadhar card link : आयकर विभागामार्फत दिलेल्या सूचनेनुसार आधार ला पॅन लिंक करणे अनिवार्य झाले आहे असे न केल्यास तुमचे पॅन कार्ड बंद होवू शकते .
Pan card Aadhar card link: 1 एप्रिल 2023 पासून आधार -पॅन लिंक करणे अनिवार्य केले गेले आहे .आयकर विभागामार्फत आधार -पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 हि देण्यात आली आहे जर या दरम्यान आपण लिंक करत नसाल तर तुमचे पॅन कार्ड 1 एप्रिल 2023 पासून एक्सपायर होईल .त्यानंतर तुम्हाला पॅन कार्डचा वापर कोठेही करता येणार नाही .
आयकर अधिनियम, 1961 के अनुसार, सभी पैन धारकों के लिए, जो छूट की श्रेणी में नहीं आते हैं, 31.03.2023 से पहले अपने पैन को आधार से जोड़ना अनिवार्य है।
जो पैन(PAN) आधार(Aadhaar) से नहीं लिंक किए गए हैं, वे पैन 01.04.2023 से निष्क्रिय हो जाएंगे ।
जो अनिवार्य है, आवश्यक है। pic.twitter.com/HiFamrv5F0
— Income Tax India (@IncomeTaxIndia) December 3, 2022
आयकर विभागाने केले ट्वीट
आयकर विभाग अधिनियम 1961 च्या नियमानुसार सर्व पॅन कार्ड धारकांना 31/03/2023 पूर्वी आधार ला पॅन लिंक करणे अनिवार्य केले गेले आहे
Pan Card Aadhar Card Link असे करा आधार आणि पॅन लिंक
- आयकर विभागाची www.incometax.gov.in ई -फाइलिंग वेबसाईट उघडा .
- वेबसाईटवर डाव्या बाजूस “link Aadhaar” हा पर्याय निवडा.
- आपला पॅन क्रमांक व आधार क्रमांक भरा .
- आधार कार्डला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर “OTP” आलेला OTP प्रविष्ठ करा.
- OTP भरल्यानंतर आपले आधार -पॅन लिंक होईल .
असे चेक करा पॅन – आधार लिंक आहे कि नाही .
- आयकर विभागाची www.incometax.gov.in ई -फाइलिंग वेबसाईट उघडा .
- डाव्या बाजूच्या “Link aadhaar status” या पर्यायावर क्लिक करा .
- आपला पॅन क्रमांक व आधार क्रमांक भरा .व “View Link Aadhaar Status ” वर क्लिक करा .
- रिझल्ट मध्ये तुमचे आधार -पॅन लिंक आहेत कि नाही हे दिसेल .
मेसेज मार्फत आधार -पॅन लिंक करण्याची पद्धत.
जे पॅन कार्ड धारक पॅन व आधार लिंक करू इच्छितात त्यांनी आपल्या आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून UIDPAN <स्पेस>< 12 अंकी आधार कार्ड क्रमांक >< स्पेस><10 digit Pan> असे टाइप करून 567678 अथवा 56161 वर मेसेज पाठवावा.
उदा .( UIDPAN 123456789321 AXCPC5274T ) send 567678 or 56161
जर तुमच्या आधार कार्ड – पॅन कार्ड वरील माहिती सारखी व योग्य असेल तर 48 तासामध्ये आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक होईल .
आधार -पॅन लिंक करण्याचे कारण .
पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्हीही ओळखीचा पुरावा असणारे कागदपत्रे आहेत .पॅन कार्ड व आधार कार्ड नसल्यास कोणतीही व्यक्ती सरकारच्या योजनांचा लाभ घेवू शकत नाही .सरकारने देशामध्ये आधार ला पॅन लिंक करणे अनिवार्य केले आहे याचे मुख्य कारण म्हणजे देशामध्ये काही लोकं TAX भरत नाही याचाच अर्थ असा कि TAX ची चोरी करतात.हे लोकं वेगवेगळ्या नावाचे पॅन कार्ड बनवून TAX चोरी करत असतात यांना आळा बसवण्यासाठी आधार ला पॅन लिंक करणे अनिवार्य केले आहे .
आधार व पॅन लिंक केल्याने होणारे फायदे .
- TAX चोरी करणाऱ्या लोकांना आळा बसेल .
- त्यामुळे TAX भरण्याचे प्रमाण वाढेल ,सरकार कडे मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्यास देशाचा विकास करण्यासाठी त्याचा उपयोग होईल.
- याबरोबरच प्रत्येक भारतीय नागरिकाची आर्थिक परिस्थिती सरकारला समजेल व ज्या लोकांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना आर्थिक सहाय्य करण्यास मदत होईल.
पॅन कार्डचे हे नियम माहित आहेत का ?
- जर तुम्ही बँकेमध्ये 50000 हून अधिक रक्कम जमा करू इच्छिता तर तुमच्याकडे पॅन कार्ड असणे बंधन कारक आहे .
- तुम्हाला जर ATM CARD / CREDIT CARD हवे असेल तर तुम्ही पॅन कार्ड असल्याशिवाय ते घेवू शकत नाही .
- तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये खाते उघडायचे असल्यास तुम्हाला पॅन कार्ड ची गरज भासेल .
- कोणत्याही प्रकारच्या 25000 हजारावरील ऑनलाइन खरेदीसाठी तुम्हाला पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे .
- कोणत्याही प्रकारचे LOAN घेण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे .
How to link pan aadhar
UIDAI हेल्पलाईन क्रमांक
जर तुम्हाला पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करण्यास काही समस्या येत असेल तुम्ही खाली दिलेल्या निशुल्क क्रमांकावर फोन किंवा ई-मेल करू शकता .
निशुल्क क्रमांक : 1800-300-1947
ई-मेल : sslsupport@uidai.gov.in

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.