Namo Shetkari Mahasamman Yojana| नमो शेतकरी महासम्मान निधी योजना ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया .
भारत हा एक कृषी प्रधान देश आहे ज्यामध्ये 80 % हून अधिक जनसंख्या हि शेती व्यवसायावरती निर्भर आहे.त्यांचा मुख्य आर्थिक स्त्रोत हा शेतीच आहे.त्यापैकी महारष्ट्रामधेच जवळपास 1.52 Cr शेतकरी संख्या आहे.याचाच विचार करता महाराष्ट्र सरकारने Pm Kisan Yojana सोबतच एक नवीन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 6 हजार रुपये वार्षिक आर्थिक सहाय्य निधी दिला जाईल.महाराष्ट्राचे सध्याचे उप-मुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 आर्थिक बजटची चर्चा करताना याची घोषणा केली.जर आपण शेतकरी असाल आणि Namo Shetkari Mahasamman Yojana संबंधी माहिती मिळवू इच्छिता तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 2023
9 मार्च रोजी 2023 – 24 चे आर्थिक बजट सादर करताना महाराष्टारचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नमो शेतकरी महा-सम्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली.हि योजना Pm Kisan Samman Nidhi Yojana या योजनेच्या आधारावरती सुरु करण्यात येत आहे . या अंतर्गत दर वर्षाला शेतकऱ्यांना 6 हजार रुपये महाराष्ट्र सरकारकडून आर्थिक सहाय्य करण्याच्या दृष्ठीने बँक खात्यात जमा करण्यात येइल.म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांना या पूर्वी Pm Kisan Yojana चे 6 हजार रुपयेचे आर्थिक सहाय्य निधी मिळत होता त्यांना महाराष्ट्र सरकारचा निधी एकत्रित करून एकून 12000 /- खात्यावर जमा केले जातील.या योजनेसाठी सरकारकडून 6900 करोड रुपये खर्च केले जातील . महारष्ट्रातील 1.52 करोड शेतकरी कुटुंबाना Namo Shetkari MahaSamman Yojana चा लाभ मिळणार आहे. यामधून त्यांच्या शेती व्यवसायाला
आर्थिक मदत होईल .
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना…#MahaBudget2023 pic.twitter.com/zvcwrujj8r
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023
Namo shetkari yojana 2023 Highlights
योजना | Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana |
लाभार्थी | उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली |
मुख्य उद्देश | शेतकऱ्यांची आर्थिक परस्थितीसाठी सहाय्य करणे |
देण्यात येणारी रक्कम | 6000 रुपये वार्षिक |
लाभार्थी | 1.52 करोड शेतकरी कुटुंब |
राज्य | महाराष्ट्र |
वेबसाईट | लवकरच उपलब्ध होईल |
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतील आता 12000 हजार रुपये.
नमो शेतकरी महासम्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना Pm Kisan Nidhi सोबतच दरवर्षाला 6000 हजार रुपये अधिक खात्यावर जमा होतील .एकुण 12000 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील .
याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येइल.
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 2023 चे लाभ
- नमो शेतकरी योजना हि केंद्र सरकारच्या PM KISAN योजनेसारखीच योजना आहे.
- शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये रक्कम दिली जाइल .
- हा निधी शेतकऱ्याच्या आधार कार्ड नोंदणीकृत बँक खात्यामध्ये जमा केला जाइल .
- निधीची 50% रक्कम राज्य सरकार व 50% निधी हा केंद्र सरकार कडून दिला जाइल.
- निधी तीन हप्त्यामध्ये Pm Kisan Nidhi सोबतच दिला जाइल .
- महाराष्ट्रामध्ये एकूण 1.52 करोड लाभार्थी आहेत .
- दरवर्षी 6900 करोड रुपये या योजनेच्या निधीसाठी खर्च केले जातील .
नमो शेतकरी योजनेसाठी पात्रता
- Namo Shetkari maha Samman Nidhi Yojana चा लाभ घेण्यासाठी शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा .
- शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन आसने आवश्यक आहे .
- लाभ घेण्यासाठी शेतकरी महाराष्ट्र कृषी विभागाकडे नोंदणीकृत असावा .
- बँक खाते आवश्यक व खात्यास आधार कार्ड नंबर लिंक असणे आवश्यक आहे .
Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana साठी लागणारी कागदपत्रे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक खाते
- जमिनीचा सात / बारा
- पासपोर्ट साइज फोटो
- मोबाईल क्रमांक
Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येइल .अर्ज प्रक्रियेसाठी लागणारी प्रणालीचे सध्या युद्ध पातळीवर काम सुरु आहे .आम्ही आर्टिकल मार्फत आपल्याला कळवू .
I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.