mortgage loan meaning in marathi: ( mortgage loan means in marathi) सर्वसाधारणपणे काही प्रकारचे लोन हे मोठ्या प्रमाणत घेतले जातात जसे कि व्यवसाय कर्ज , वैक्तिक कर्ज , वाहन कर्ज , शेती कर्ज , मालमत्ता कर्ज, सोने तारण कर्ज इत्यादी. (mortgage meaning in marathi )बऱ्याच जनानी भरपूर वेळा लोन घेताना किंवा बँकेमध्ये ” मॉर्गेज ” हा शब्द तर ऐकलाच असेल तर आज या लेखामार्फत मॉर्गेज म्हणजे काय व आणि मॉर्गेज लोन कसे घ्यावे हे जाणून घेणार आहोत.
mortgage loan meaning in marathi | मॉर्गेज लोन म्हणजे काय ?
mortgage loan means in marathi : मॉर्गेज या शब्दाचा सरळ -सरळ मराठीतील अर्थ आहे “तारण “. बऱ्याचवेळा कर्ज घेताना बँका तारण ( मॉर्गेज) मागतात .मॉर्गेज म्हणजे लोन घेताना त्या लोन रकमेच्या बदल्यात स्वतःच्या मालकीची मालमत्ता (उदा . घर ,दुकान ,शेती ,वाहन) बँकेकडे गहाण स्वरुपात ठेवणे. मालमत्तेची जी काही कागदपत्रे असतील ती कागदपत्रे बँकेमध्ये जमा करावी लागतात .
Why does a bank take a mortgage? | बँक मॉर्गेज का घेते ?
mortgage loan meaning in marathi: एखाद्या व्यक्तीने बँकेतून कर्ज घेण्यासाठी आपले घर किंवा शेत मॉर्गेज ठेवले तर त्या सबंधित मालमत्तेच्या सद्या असलेल्या बाजारभावाच्या 75% पर्यंतची रक्कम बँक कर्ज स्वरुपात देते. काही कारणास्तव त्या कर्ज घेणाऱ्या व्यक्तीने ठरवून दिलेल्या वेळेत कर्जाची रक्कम बँकेत जमा केली नाही तर त्या व्यक्तीने मॉर्गेज ठेवलेल्या मालमत्तेवर बँक जप्ती आणू शकते व ती मालमता विकून कर्जाची रक्कम जमा करून घेतली जाते. मालमत्ता विकण्याचे अधिकार बँकेकडे असतात .(mortgage loan means in marathi)
✅ हेही वाचा 👉 कर्जमुक्त होण्याचा रामबाण उपाय 👈
types of mortgage loans in marathi | मॉर्गेज लोन चे प्रकार
- Loan against Property ( LAP) : जर तुम्हांला घराची सुधारणा / दुरुस्ती करायची असेल किंवा व्यवसायाची दुकान वाढवायचे असेल तर तुम्हांला Loan against Property ( LAP ) लोन घ्यावे लागते. स्वतंत्र घर ,अपार्टमेंट किंवा व्यवसायाचे दुकान , कार्यालय यासाठी हे लोन मिळू शकते .कर्ज घेतल्यावर कर्ज रक्कम हि तुमाला मासिक हप्त्याने भरावी लागते त्यासाठीचा कालावधी 15 वर्षे पर्यंतचा आसू शकतो .
- Adjustable mortgage loan : हे लोन घेण्यासाठी देखील बँकेला मॉर्गेज द्यावे लागते .पण या कर्जावर आकारण्यात येणारा व्याजदर हा स्थिर नसतो तो रिजर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बदलत असतो .
- Fixed rate mortgage : हे असे मॉर्गेज लोन आहे. ज्यावर आकारला जाणार व्याजदर हा लोन घेतल्यापासून लोन संपेपर्यंत एकसारखा असतो. त्यामध्ये बदल होत नाही .
- Simple Mortgage Loan : हे एक लोकप्रिय सर्वसाधारण मॉर्गेज लोन आहे. ज्यामध्ये कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला आपली मालमत्ता बँकेला किंवा फायनान्स ला हस्तांतरीत करण्याची गरज नसते .( mortgage loan means in marathi )पण जर कर्ज घेतलेल्या व्यक्तीने कर्जाची रक्कम न भरल्यास ती मॉर्गेज ठेवलेली मालमत्ता विकण्याचे अधिकार बँकेकडे असतात .
- English Mortgage : या मॉर्गेज कर्ज प्रकारामध्ये कर्ज घेतलेल्या व्यक्तीने एक विशिष्ठ तारखेपर्यंत कर्ज रक्कम परतफेड करावयाची आसते. जेवढा कालावधी तो ते कर्ज सुरु ठेवेल तेवढेच त्याला व्याज द्यावे लागते.
- Usufructuary Mortgage Loan : हे कर्ज घेणाऱ्याला आपल्या मॉर्गेज ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा कर्ज देणाऱ्यास द्यावा लागतो व त्या मालमत्तेतून मिळणारा नफा ( भाडे स्वरुपात किंवा इ .) कर्ज देणाऱ्यास मिळतो . त्यासाठी कर्जदाराला अतिरिक्त व्याज देण्याची गरज नसते अथवा मासिक हप्ता भरण्याची गरज नसते ,तो निव्वळ मुद्दल रक्कम देवून कर्ज बंद करू शकतो .

Benifits of Mortgage Loan | मॉर्गेज लोन चे फायदे
✅ मॉर्गेज लोन रकमेच्या परतफेडीचा कालावधी हा 15 वर्षापर्यंतचा आसतो. त्यामुळे अगदी कमी हप्त्याची रक्कम ठेवून तुम्ही हे कर्ज फेडू शकता.त्यामुळे आर्थिक तान देखील येत नाही .
✅ मॉर्गेज लोनवर आकरण्यात येणारा व्याजदर हा अत्यंत कमी असतो त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त व्याज द्यावे लागत नाही .
✅ वैक्तिक लोन किंवा इतर लोन पेक्षा मॉर्गेज लोन घेतल्यास अधिक रक्कमेचे कर्ज मिळते .
✅ मॉर्गेज लोन घेतल्यास कमी सिबिल स्कोर ( CIBIL SCORE ) मध्ये देखील कर्ज मिळू शकते .
Advantages of Mortgage Loan | मॉर्गेज लोन ची विशीष्टे
- मॉर्गेज लोन हे जास्त कालावधीसाठी घेवू शकता .
- इतर लोन च्या तुलनेत मॉर्गेज केल्यास जास्त रक्कम कर्ज स्वरुपात मिळते .
- मॉर्गेज लोन तुम्ही नवीन घर विकत घेण्यासाठी , घराचे बांधकाम करण्यासाठी ,व्यवसायाचे दुकान बांधण्यासाठी ,रिकामी जागा इत्यादी वर घेवू शकता .यासाठी त्याचा मालकी हक्क तुमच्याकडे असणे गरजेचे असते .
- तुम्ही जागा मॉर्गेज ठेवून कर्ज घेवून ती रक्कम व्यवसायासाठी किंवा इतर गुंतवणुकीसाठी वापरू शकता .
mortgage loan documents list | मॉर्गेज लोनसाठी लागणारी कागदपत्रे
नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- लाईट बिल
- पासपोर्ट साईज फोटो
- पेमेंट स्लीप
- मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- मॉर्गेज ठेवत असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे .
- ई -मेल
- मोबाईल क्रमांक
- 2 ओळखीच्या व्यक्तींची नावे .
स्वंयरोजगार / व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- लाईट बिल
- पासपोर्ट साईज फोटो
- मागील सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- IT RETURN 2 YEARS
- मॉर्गेज ठेवत असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे .
- ई -मेल
- मोबाईल क्रमांक
- 2 ओळखीच्या व्यक्तींची नावे .
mortgage loan eligibility criteria| मॉर्गेज लोन पात्रता
mortgage loan meaning in marathi
- मॉर्गेज लोन घेणाऱ्या व्यक्तीचे वय हे 24 वर्ष ते 65 वर्ष दरम्यान असले पाहिजे .
- लोन घेणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोर ( CIBIL SCORE ) हा किमान 650 पेक्षा जास्त असला पाहिजे .
- नोकरी करणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 4,00,000/– पेक्षा जास्त असले पाहिजे .
- स्वंयरोजगार असणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 3,00,000/- पेक्षा जास्त असावे लागते .
- मॉर्गेज देवू इच्छित मालमत्ता स्वतःच्या नावावर असणे गरजेचे आहे .
- मॉर्गेज देवू इच्छित मालमत्तेवर यापूर्वी कर्ज घेतलेले नसावे .
mortgage loan rate of interest | व्याजदर किती असतो.
बँक | व्याजदर | संपर्क क्रमांक | वेबसाईट |
HDFC BANK | वार्षिक 8.40% ते 10.50% | 1800-210-0018 | www.hdfc.com |
Bank Of Maharashtra | वार्षिक 10.95% ते 11.95% | 1800-233-4526 | www.bankofmaharashtra.in |
ICICI BANK | वार्षिक 11.35% ते 12.50% | 1800-200-3344 | www.loans.icicibank.com |
STATE BANK OF INDIA | वार्षिक 8.40% ते 11.75% | 1800-425-3800 | www.sbi.co.in |
AXIS BANK | वार्षिक 8.70% ते 10.95% | 1860-500-5555 | www.axisbank.com |
IDFC BANK | वार्षिक 7.00% ते 14.00% | 1800-10-888 | www.idfcfirstbank.com |
disadvantages of Mortgage Loan | मॉर्गेज लोनचे तोटे
- मॉर्गेज लोन घेतल्यावर हप्ते किंवा रक्कम न भरल्यास मॉर्गेज दिलेली मालमत्ता जप्त होवू शकते .
- तुम्हांला व्याजाव्यातिरिक्त मूल्यमापन फी ,मुद्रा फी व इतर फी ज्यादा द्यावी लागते .
- मॉर्गेज लोन ची रक्कम न भरल्यास भविष्यात तुम्हांला मॉर्गेज लोन घेण्यास अडचणी येवू शकतात .
- मॉर्गेज दिलेली मालमत्ता तुम्ही अडचणीच्या काळात विकू शकत नाही .तुम्हांला ती मालमत्ता विकण्यासाठी लोन ची पूर्ण रक्कम चुकती करणे गरजेचे आहे .
✅हेही वाचा👉 3 लाख देणार सरकार आली सरकारची नवीन योजना. 👈
FAQ on mortgage loan meaning in marathi
प्रश्न 1) मॉर्गेज लोन म्हणजे काय ?
उत्तर : एखादी मालमत्ता बँक किंवा कर्ज देणाऱ्याकडे गहाण ( तारण ) ठेवून कर्ज घेणे याला मॉर्गेज असे म्हणतात .
प्रश्न 2) मॉर्गेज लोन किती कालावधीसाठी घेवू शकतो ?
उत्तर : मॉर्गेज लोन तुम्ही 15 ते 20 वर्ष कालावधीसाठी घेवू शकता
( वरील लेखामध्ये तुम्हाला mortgage loan meaning in marathi, mortgage loan means in marathi, types of mortgage loans in marathi, mortgage loan documents list, mortgage loan eligibility criteria याची संपूर्ण माहिती मिळाली .)

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.