Mahila Samman Yojana:आजपासून मिळणार महिलांना S.T प्रवासात 50% सवलत.

Mahila Samman Yojana: महिलांना S.T प्रवासात 50% सवलत.

आज पासून मिळेल महाराष्ट्रातील सर्व महिलांना S.T प्रवास तिकिटामध्ये 50 % सुट.असा जीआर काढण्यात आला आहे .2023 चे अर्थसंकल्प बद्धल बोलताना शिंदे सरकार मार्फत याची घोषणा करण्यात आली होती अखेर त्याचा जीआर निघाला .

Mahila Samman Yojana in Marathi : महाराष्ट्र राज्य सरकारच्या अध्यादेश प्रमाणे सर्व महिलांना दिनांक 17 मार्च 2023 पासून S.T प्रवासात 50% सवलत देण्यास सुरवात केली गेली आहे .म्हणजेच आज पासून जी महिला S.T ने प्रवास करेल त्या महिलांना “Mahila Samman Yojana” अंतर्गत फक्त तिकिटाची 50% रक्कम भरावी लागेल व उर्वरित 50 % रक्कम हि अर्थसंकल्पांच्या बजेटमधून S.T महामंडळाला देण्यात येईल .

S.T मध्ये फक्त याच गाड्यात 50% सवलत मिळणार .

S.T महामंडळाच्या वतीने जवळपास सर्व प्रकारच्या बसमध्ये म्हणजेच शिवशाही ,मिनी बस ,निमआराम ,साधी बस ,शिवनेरी बस ,शिवाईच्या सर्व बसेस ,विनावाताकुलीन आसनी बसेस आश्या सर्व बसेसमध्ये 50% सवलत महिलांना देण्यास दिनांक 17 मार्च 2023 पासून करण्यात आली आहे .व भविष्यात सुरु केल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्यांवर हि 50% सवलत लागू केली जाईल .

यापूर्वी सरकारकडून भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्धापनदिन निमित्त 75 वर्षाहून अधिक वय असलेल्या लोकांना S.T तिकीटामध्ये 100% सवलत सुरु करण्यात आली होती आहे व वयोवर्षे 65 ते 74 दरम्यान वय असणाऱ्या नागरिकांना सर्व प्रकारच्या S.T बसेस मध्ये तिकीट रकमेच्या 50% सवलत दिली गेली होती .या Mahila Samman Yojana चा फायदा किती महिलांना होईल हे आता सांगणे शक्य नाही पण S.T महामंडळाच्या मते 35% ते 40 % महिला प्रवास करतात असा अंदाज व्यक्त केला गेला आहे .यामुर्वी जर तुम्ही तिकीट आरक्षण घेतले असेल तर जे प्रवासी मोबाईल चा वापर करून तिकीट घेतील त्या प्रवशांकडून आरक्षण आकार घेतला जाईल .पण ज्या महिलांना यापूर्वीचे आरक्षण आहे त्यांना याचा लाभ घेता येणार नाही असे स्पष्ठ केले गेले आहे .

👉  हे पण वाचा  शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये ऐवजी 12 हजार रुपये.

Leave a Comment