Magel tyala solar pump yojana | सोलर पंप योजनेचा लाभ घेऊन तुम्ही करोडपती कसे होऊ शकता?

Magel tyala solar pump yojana | PM-KUSUM योजनेद्वारे 70 % सबसिडीवर सोलर पंप मिळवा !

शेतकरी बंधुनो,

महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.36 करोड ते 1.52 करोड शेतकरी बांधव आहेत आणि आपल्या सर्वाना माहिती आहे की, शेती करत असताना पाण्याच्या समस्येने आपल्याला किती त्रास होतो. अनियमित वीज पुरवठा, वाढत्या वीज बिलांची डोकेदुखी, कधीही लावले जाणारे लोडशेडिंग आणि  या सगळ्यावर समस्यांवर कायमचा उपाय म्हणजे शासनाची हि नवीन योजना ती म्हणजे Magel tyala solar pump yojana.

पण तुम्हांला पण प्रश्न पडत असेल Magel tyala solar pump yojana खरंच फायदेशीर आहे का ?  होय, हि योजना खूप फायदेशीर आहे आणि आज मी तुम्हाला सरकारच्या या जबरदस्त योजनेबद्दल सांगणार आहे, जी तुमच्या सगळ्या अडचणी दूर करेल. या योजनेचं नाव आहे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (PM-KUSUM) योजना या योजनेला मराठी मध्ये “मागेल त्याला सोलर पंप योजना “असे देखील म्हणतात  .

या योजनेचा लाभ घेणे म्हणजे नुसती सबसिडीचा फायदा घेणे असे नाही, तर आपल्या शेतीला आधुनिक बनवण्याचं मुख्य  एक पाऊल आहे.

Magel tyala solar pump yojana| PM KUSUM योजना म्हणजे काय ?

सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर ही सरकारची अशी योजना आहे, जी तुम्हाला सौर ऊर्जेवर चालणारा पंप बसवण्यासाठी आर्थिक मदत करते. या योजने मार्फत  सरकार 70% ते 90% पर्यंत सबसिडी शेतकऱ्यांना देते. याचा अर्थ असा कि तुम्ही खूप कमी पैशांत आपल्या शेतावर सोलर पंप बसवू शकता.

या योजनेचा लाभ तुम्ही तीन प्रकारे घेवू शकता .

  1. या योजनेचा मार्फत तुम्ही तुमच्या शेतात सौर ऊर्जा प्रकल्प लावून वीज तयार करू शकता आणि ती सरकारला विकून पैसे कमवू शकता.
  2. या योजनेचा मार्फत तुमच्या शेतात फक्त तुमच्या शेतीसाठी सोलर पंप बसवला शकता आणि अनियमित पुरवठा , लोड शेडींग , वीज बिल पासून मुक्त होवू शकता.
  3. या योजनेचा मार्फत ग्रीडला जोडलेला सोलर पंप मिळतो, ज्यामुळे तुम्ही वापरून उरलेली वीज पुन्हा सरकारला विकून पैसे कमवू शकता.

 

कुसुम योजनेसाठी कोण पात्र आहे ? | pm kusum yojana eligibility criteria

  • शेतकरी: कोणताही वैयक्तिक शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतो.
  • शेतकऱ्यांचे गट: शेतकऱ्यांचे गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) आणि पाणी वापरकर्ता संघटना देखील या योजनेसाठी पात्र आहेत.
  • जमिनीची मालकी: अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. जमिनीचा7/12 चा उतारा अर्ज करताना आवश्यक असतो.
  • विद्युत पंप नसलेले शेतकरी: ज्या शेतकऱ्यांकडे सध्या त्यांच्या शेतीसाठी वीज जोडणी (electric pump) नाही आणि जे सिंचनासाठी डिझेल पंपावर अवलंबून आहेत, असे शेतकरी या योजनेसाठी प्रामुख्याने पात्र आहेत.

 

कुसुम सोलर पंपची किंमत किती आहे ? | pm kusum solar pump price

कुसुम सोलर पंपाची अंदाजित किंमत (Subsidy शिवाय )

  • 3 एचपी डीसी (DC) पंप:       ₹ 1.6 लाख ते ₹ 1.8 लाख
  • 5 एचपी डीसी (DC) पंप:       ₹ 2.5 लाख ते ₹ 2.7 लाख
  • 7.5 एचपी डीसी (DC) पंप:    ₹ 3.5 लाख ते ₹ 4.0 लाख

 

PM KUSUM योजनेचे फायदे | Magel tyala solar pump yojana

  • वीज बिलातून कायमची सुटका : हा या योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे.  सोलर पंप लावला की तुम्हांला वीज बिल भरण्याची आवश्यकता नाही.वीज बिलातून कायमची सुटका होईल.

 

  • शेतीसाठी कधीही पाणी उपलब्ध : दिवसा भरपूर सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे लाईट असो किंवा नसो तुम्ही कधीही तुमच्या शेताला पाणी पाजू शकता. यामुळे पिकांचं होणारे नुकसान टाळले जावू शकते.

 

  • पर्यावरणाचे होणारे नुकसान टळते : सोलर पंप बसवल्याने प्रदूषण होत नाही उलट पर्यावरणाला मदत होते.

 

  • टिकाऊ आणि कमी खर्चिक:  एकदा सोलर पंप बसल्यावर  सोलर पॅनल 25 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकतात. त्यामुळे देखभाल खर्च जवळपास नसतोच.

 

  • वीज विकून पैसे कमवू शकतो : जर तुमच्याकडे ग्रीड कनेक्टेड पंप बसवला असेल, तर उन्हाळ्यात जास्त वीज तयार झाली की ती सरकारला विकून त्यातून पैसे कमवू शकता.

 

Magel tyala solar pump yojana documents | आवश्यक कागदपत्रे 

 

  1. आधार कार्ड
  2. तुमच्या जमिनीचा ७/१२ चा उतारा
  3. बँक खात्याची पासबुकची कॉपी
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो
  5. तुमचा मोबाईल नंबर

 

 

👉 हेही वाचा  कर्जमुक्त होण्याचा रामबाण उपाय  👈

 

 

how to apply solar pump in maharashtra : अर्ज प्रक्रिया  

 

✅ ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | Online Process

 

https://www.mahadiscom.in किंवा https://www.mahaurja.com वेबसाईट वर जावा .

 

👉Step 1 : Magel tyala solar pump yojana नोंदणी आणि पात्रता तपासणी करणे.

  1. सर्वात आधी , तुम्हाला महावितरण (MSEDCL) किंवा महाऊर्जा (MahaUrja) च्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.
  2. पोर्टलवर “PM-KUSUM योजना” किंवा “सौर कृषी पंप” असा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  3. येथे तुम्हाला एक नोंदणी फॉर्म मिळेल. तुमचा आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि जमिनीचा 7/12 उतारा यांसारखी प्राथमिक माहिती भरून नोंदणी करावी लागेल.
  4. नोंदणी झाल्यावर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल.

 

👉Step 2 : कागदपत्रे अपलोड करणे

खालील दिलेली सर्व कागदपत्रे तुम्हांला स्कॅन करून किंवा स्पष्ट फोटो काढून उपलोड करावे लागतील .

  1. आधार कार्ड:  अर्जदाराची ओळख पटवण्यासाठी.
  2.  7/12 उतारा:  तुमच्या नावावर जमीन आहे हे सिद्ध करण्यासाठी.
  3. बँक पासबुकची प्रत:  सबसिडीची रक्कम तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी. (बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे).
  4. विहिरीचा किंवा पाण्याच्या स्रोताचा पुरावा :   विहीर, बोअरवेल, नदी किंवा इतर पाण्याच्या स्रोताची माहिती.
  5. पासपोर्ट आकाराचा फोटो.
  6. जात प्रमाणपत्र:  (आवश्यक असल्यास)

 

👉Step 3 : ऑनलाइन अर्ज भरणे.

  1. तुम्ही तुमच्या युजर आयडी आणि पासवर्डने अधिकृत पोर्टलवर लॉग इन करा.
  2. येथे तुम्हाला अर्ज फॉर्म दिसेल या फॉर्ममध्ये खालील माहिती काळजीपूर्वक भरा जसे कि वैयक्तिक माहिती [ नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जमिनीचा तपशील गाव, तालुका, जिल्हा, गट क्रमांक, क्षेत्रफळ , गरजेनुसार पंपाची क्षमता ३ एचपी, ५ एचपी, ७.५ एचपी. ]
  3. सर्व माहिती भरल्यावर, तुम्ही स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करा.

 

👉Step 4 : अर्ज शुल्क भरणे.

सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यावर  तुम्हाला अर्ज शुल्क भरण्यास सांगितले जाईल. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागते.अर्ज शुल्क किती आसते हे आपण खाली दिलेल्या उदा . मधून समजून घेवूयात Magel tyala solar pump yojana.

👇 उदाहरणासह समजून घ्या 👇

समजा, एका 5 एचपी (HP) सोलर पंप बसवण्याचा एकूण खर्च अंदाजे 2,50,000/- रुपये येतो.

 ♻️सर्वसाधारण प्रवर्गासाठी

सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 10% रक्कम भरावी लागते.

  • तुमचा हिस्सा          (10 %):   2,50,000/- रुपयांचे 10% = 25,000/- रुपये.
  • सरकारी सबसिडी   (90 %):   2,50,000/- रुपयांचे 90% = 2.25,000 रुपये.

म्हणजेच, तुम्हांला फक्त 25,000/- रुपये भरावे लागतील आणि उर्वरित 2.25 लाख रुपये सरकार मार्फत सबसिडी स्वरुपात मिळेल.

 

♻️ अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST) प्रवर्गासाठी

या प्रवर्गातील शेतकऱ्यांना  एकूण खर्चाच्या 5% एवढी रक्कम भरावी लागते.

  • तुमचा हिस्सा           (5%)    :2,50,000/- रुपयांचे 5% = 12,500/- रुपये.
  • सरकारी सबसिडी   (95%)   :2,50,000/- रुपयांचे 95% = 2,37,500/- रुपये.

या प्रवर्गातील शेतकऱ्यांना फक्त 12,500/- रुपये भरावे लागतील आणि उर्वरित 2,37 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम सरकार मार्फत दिली जाईल.

शुल्क भरल्यावर, तुम्हाला तुमच्या अर्जाचा एक नोंदणी क्रमांक (Application Number) मिळेल. हा क्रमांक जपून ठेवा आणि  या क्रमांकाचा वापर करून तुम्ही  तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेवू शकता .

 

👉Step 5: अर्जाची स्थिती तपासणे

  1. पोर्टलवर स्थिती तपासण्यासाठी “अर्ज स्थिती तपासा” किंवा  (Check Application Status) असा पर्याय असतो.
  2. तुमचा नोंदणी क्रमांक वापरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.  ( उदा. ‘अर्ज स्वीकारला’, ‘पडताळणी सुरू आहे’ किंवा ‘क्षेत्र तपासणी बाकी आहे’.)

 

पुढील प्रक्रिया

तुमचा अर्ज स्वीकारल्यावर, संबंधित सरकारी अधिकारी तुमच्या शेताची पाहणी (Site Survey) करतात. पाहणीनंतर तुम्हांला तुमच्या वाट्याचा खर्च ( वरीलप्रमाणे  तुमच्या हिश्श्याची रक्कम ) भरावी लागते. हि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतात सोलर पंप बसवण्याचे काम सुरू करण्यात  येईल.

या सोप्या प्रक्रियेचे पालन करून तुम्ही PM-KUSUM ( Magel tyala solar pump yojana) योजनेचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या शेतीचे वीज बील मुक्त आणि आधुनिक बनवू शकता. अर्ज करताना काही अडचण आल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

✅ ऑफलाइन अर्ज प्रक्रिया | Offline Process

Magel tyala solar pump yojana साठ ऑफलाइन अर्ज  तुम्हांला तुमच्या नजीकच्या कृषी विभागाच्या किंवा महावितरण ऑफिसमध्ये जाऊन अर्ज भरावा लागेल व त्यासोबत आवश्यक वरील सांगितलेली कागदपत्रे जोडावी लागतील व त्यानंतर तो फॉर्म जमा करावा लागेल. अर्ज जमा केल्यावर काही महिन्यांत तुमच्या अर्जाची पडताळणी होते.

 

या सोलर पंप योजनेचा लाभ घेवून तुम्ही वीज बिलाची बचत करू शकता , याने पीक उत्पादन वाढू शकते आणि अतिरिक्त तयार होणाऱ्या विजेची विक्री सरकारला करून अधिक पैसे कमवू शकतो .यामुळे करोडपती होण्याची शक्यता वाढेल.

 

………………………………………………………………………………………………………………..

सतत पडणारे काही महत्त्वाचे प्रश्न (FAQ)

प्रश्न 1: मला किती सबसिडी मिळेल ?
उत्तर: साधारणपणे 70% ते 90% पर्यंत सबसिडी मिळू शकते. यामुळे तुम्हाला खूप कमी पैसे भरावे लागतात.

प्रश्न 2: कोणता पंप घ्यावा ?
उत्तर: 3 एचपी, 5 एचपी किंवा 7.5 एचपी पंप उपलब्ध आहेत. तुमच्या शेताच्या गरजेनुसार तुम्ही निवडू शकता.

प्रश्न 3: एकूण खर्च किती येतो ?
उत्तर: उदा. 5 एचपी पंपाचा खर्च साधारण 2.5 लाख असतो, पण सबसिडी मुळे तुम्हाला फक्त 25,000 ते 75,000 रुपये भरावे लागतील.

प्रश्न 4: अर्ज कधी मंजूर होतो ?
उत्तर: साधारणपणे 3 ते 4 महिन्यांत तुमच्या अर्जाला मंजुरी मिळू शकते.

प्रश्न 5: पंपाची काळजी कशी घ्यावी ?
उत्तर: पॅनलवर धूळ साचू नये म्हणून वेळोवेळी ते स्वच्छ करावे लागतात. बाकी काही विशेष देखभाल लागत नाही.

प्रश्न 6: मी खरंच यातून करोडपती होऊ शकेन का ?
उत्तर: थेट नाही, पण, वीज बिलाची बचत, पिकांचं वाढलेलं उत्पादन आणि अतिरिक्त वीज विक्रीतून मिळणारे पैसे हे सगळे मिळून तुमची आर्थिक परिस्थिती खूप मजबूत करतात.

 

👉 हेही वाचा इन्स्टावर पैसे कसे कमवायचे? 👈

Leave a Comment