lek ladki yojana marathi : लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा

lek ladki yojana marathi :- लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्रातील गरीब मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन स्वरुपात देण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली होती . त्या योजनेचे नाव आहे लेक लाडकी योजना 2023. या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना सरकार आर्थिक मदत म्हणून केला जाणार आहे .

lek ladki yojana marathi : महाराष्ट्र राज्य सरकार लेक लाडकी योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलींना जन्मापासून ते शिक्षण पूर्ण होई पर्यंत आर्थिक मदत करेल जे वर्ग श्रेणीनुसार वेगवेगळ्या वयोगटात दिले जातील. महत्वाची बाब म्हणजे लेक लाडकी हि योजना गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिकबल देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे गरीब कुटुंबात जन्मलेल्या सर्व मुलींना आर्थिक मदत देऊन त्या मुली किंवा महिला सक्षम होण्यसाठी चालना मिळू शकते. या योजनेचा लाभ कसा मिळवावा व त्याची प्रक्रिया जाणून घेण्यसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

lek ladki yojana marathi | लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा

lek ladki yojana marathi : लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा या योजनेची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023 -24 अर्थसंकल्पाच्या वेळी केली या योजने चा फायदा मुलीं किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी होईल . lek ladki yojana marathi च्या मार्फत राज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना सर्वात जास्त लाभ दिला जाणार. मुलगी जन्मापासून ते शिक्षण पूर्ण होई पर्यंत सरकार 5 हप्त्यांमध्ये आर्थिक मदत करेल. आर्थिक मदत मिळाल्याने मुलींच्या शिक्षणात कोणतीही आडचणी येणार नाहीत . त्यामुळे समाजातील मुलींबाबतची आर्थिकबळ मिळेल .

महाराष्ट्र lek ladki yojana marathi सुरु केल्याने मुलींचा सामाजिक स्तर सुधारू शकेल आणि भ्रूणहत्येसारख्या गुन्हे यापुढे घडणार नाहीत त्या गुन्ह्यांना आळा बसेल. लेक लाडकी योजनेंतर्गत, ज्या मुलीची नोंदणी केली जाईल त्या मुलीला 18 वर्षांची झाल्यावर सरकारकडून एकरकमी 75,000 रुपये देण्यात येईल. मुलींचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल,व मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देखील मिळेल.

lek ladki yojana marathi | लेक लाडकी योजनेचे उद्दिष्ट  

lek ladki yojana marathi : राज्य सरकारचा लेक लाडकी योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश हा राज्यातील गरीब लोकं जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्या मुलीच्या जन्मापासून ते तिचे पूर्ण शिक्षण पूर्ण होई पर्यंत आर्थिक मदत करणे हा आहे.यामुळे समाजात असणारी मुलींबद्दलची नकारात्मक विचारसरणी बदलेल आणि भ्रूणहत्येसारखे गुन्हे थांबतील. या योजनेच्या अंतर्गत मुलींना 5 श्रेणींमध्ये आर्थिक निधी दिला जाईल. मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत हि महाराष्ट्र सरकार करेल . लाभार्थी मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला पुढील शिक्षण घेण्यासाठी 75 हजार रुपये दिले जातील. जेणेकरून मुलीला त्या रकमेचा वापर करून उच्च शिक्षण घेता येईल. त्याचे भविष्य उज्वल करता येईल,स्वतःच्या पायावर उभे राहता येईल.

👉 हे हि वाचा  नवीन योजना झाली सुरु शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये.

योजनेत आर्थिक मदत कशी दिली जाईल ?

लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा : लाडकी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि पिवळे व केशरी रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास, त्या मुलीला मदत स्वरुपात 5000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल. त्यानंतर ती मुलगी जेंव्हा शाळेत जायला लागेल तेव्हा प्रथम श्रेणीत 4000 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून देण्यात येईल. व त्यानंतर त्या मुलीने इयत्ता सहावी वर्गात प्रवेश घेतल्यावर त्या मुलीला सरकारकडून 6000 रुपयांची मदत करण्यात येईल . तसेच अकरावीत प्रवेश करणाऱ्या मुलीला ८००० रुपये देण्यात येतील . मुलगी 18 वर्षे वयाची झाल्यावर म्हणजेच बारावी पूर्ण झाल्यावर तिला सरकारकडून एकरकमी 75000 रुपये दिले जातील. ही रक्कम मुलीच्या लग्नासाठी वापरता येवू शकते. महाराष्ट्र राज्यात ही योजना राबवल्याने त्या मुलीं स्वावलंबी आणि सक्षम बनतील .या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी सरकारकडून लवकरच मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या जातील.

lek ladki yojana benifits  | महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये.

  • लेक लाडकी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लाभ या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • या योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या मुलीना जन्मापासून ते शिक्षण पूर्ण होई पर्यंत आर्थिक मदत दिली जाईल .
  • केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड असणाऱ्या कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5,000 रुपयांची मदत दिली जाईल.
    मुलगी शाळेत जावू लागल्यावर  तिला इयत्ता पहिलीच्या वर्गातच  6000  हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाईल .
    इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश घेतल्यावर तिला 7000 रुपयांची मदत केली जाईल .
    त्याचप्रमणे जेव्हा ती 11 वी मध्ये जाईल तेव्हा त्या मुलीला 8000 रुपयांची मदत मिळेल.
    त्यानंतर मुलगी जेव्हा 18 वर्षांची होईल किंवा बारावी पूर्ण झाल्यावर तिला 75 हजार रुपयांची एकरकमी मदत सरकारकडून देण्यात येईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे.
  • या योजनेमुळे त्या गरीब कुटुंबाला खूप मोठी मदत मिळेल व मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही.
  • हि योजना घेण्यासाठी मुलीचा जन्म हा सरकारी दवाखान्यात होणे गरजेचे आहे . योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासून अर्ज करावा लागेल .
  • यापुढे गरीब कुटुंबात मुलगी जन्माला येणे हे ओझे मानले जाणार नाही. व त्या मुलीचा आर्थिक ताण पण कुटुंबावरती येणार नाही.

लेक लाडकी योजना 2023 साठी पात्रता.
लेक लाडकी योजनेचा लाभार्थी हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

लेक लाडकी योजनेसाठी राज्यातील सरकारी दवाखान्यात जन्मलेल्या मुलीच पात्र असतील.
राज्यातील पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असलेले कुटुंबच मुलींसाठी या योजनेचा लाभ घेवू शकतात.
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे व त्यांच्या पालकांकडे बँक खाते असणे गरजेच आहे.
वयाच्या १८ वर्ष पूर्ण झाल्यावर या योजनेचा एकरकमी लाभ दिला जाईल.

 

lek ladki yojana documents | लेक लाडकी योजना कागदपत्रे

1 मुलीचे जन्म प्रमाणपत्र
2 पालकांचे आधार कार्ड
3 पिवळे आणि केशरी रेशन कार्ड
4 उत्पन्न प्रमाणपत्र दाखला
5 जात प्रमाणपत्र दाखला
6 बँक खाते पासबुक
7 पत्त्याचा पुरावा
8 मोबाईल नंबर
9 पासपोर्ट आकाराचा फोटो

lek ladki yojana marathi | लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा

 लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा : काही दिवसापूर्वीच या योजनेची घोषणा करण्यात आली आहे ,परंतु हि योजना लवकरच सुरु करण्यात येईल सध्या या योजनेची कोत्याही प्रकारच्या नोंदणी प्रक्रीये बद्धल सरकारने घोषणा केलेली नाही. नोंदणीचा पर्याय लवकरच उपलब्ध होईल.जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येईल.

Leave a Comment