Hsrp number plate for old vehicle maharashtra | HSRP नंबर प्लेट म्हणजे काय ?

Hsrp number plate for old vehicle maharashtra | HSRP नंबर प्लेट म्हणजे काय ?

तुम्हीपण जर 31 मार्च 2019 पूर्वी खरेदी केलेली 2 व्हीलर , 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर वापरत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. Hsrp number plate for maharashtra परिवहन विभागाच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये 31 मार्च 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांना Hsrp number plate लावणे बंधनकारक करण्यात आले आहे . Hsrp number plate वाहनांना लावण्याची अंतिम तारीख हि 30 एप्रिल 2025 देण्यात आली आहे. जर तुम्ही HSRP नंबर प्लेट तुमच्या वाहनांना बसवली नसेल तर तुम्हांला किमान 500 रुपये ते 10,000/- रुपये पर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

Maharashtra hsrp number plate | HSRP नंबर प्लेट चे फायदे काय आहेत.

  1. HSRP नंबर प्लेट ला एक युनिक कोड असल्याने तुमच्या गाडीची नंबर प्लेट दुसरी व्यक्ती बनवू शकणार नाही किंवा वापरू शकणार नाही .Maharashtra hsrp number plate.
  2. HSRP नंबर प्लेट हि बसवण्यासाठी रिवेट (REVET) चा वापर केला जातो. त्याने वाहन चोरी झाल्यावर वाहन शोधून काढण्यासाठी मदत होईल.
  3. HSRP नंबर प्लेट हि अल्युमिनियम धातूने बनवल्याने ती लवकर खराब होत नाही .
  4. HSRP नंबर प्लेट वरील होलोग्राम स्टीकर मुळे गाडीची सुरक्षा वाढते.
  5. HSRP नंबर प्लेट सक्तीची केल्याने वाहनाची माहिती शोधून काढणे सोपे होईल.

 

Hsrp number plate for old vehicle maharashtra | कोण कोणत्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवावी लागेल .

परिवहन विभागाच्यानिर्देशानुसार 31 मार्च 2019 पूर्वी खरेदी केलेल्या खालील सर्व प्रकारच्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणे सक्तीचे असेल .

  1. दुचाकी वाहने ( Two Wheeler)
  2. तीन चाकी वाहने ( Three Wheeler)
  3. ट्रॅकटर
  4. चारचाकी वाहने .( Four Wheeler Non -Transport)
  5. चारचाकी व्यवसायिक वाहने . ( Four Wheeler Transport )
  6. इतर अवजड मालवाहतूक वाहने. ( Goods Carriers )

 

हेही वाचा 👉 हरवलेला मोबाईल कसा शोधावा. 👈

 

Maharashtra hsrp number plate price | HSRP नंबर प्लेट ची किंमत किती आहे.

 

अनु .   वाहन प्रकार  शुल्क 
1   दुचाकी वाहने ( Two Wheeler) 531 /-
2   तीन चाकी वाहने ( Three Wheeler) 590 /-
3   ट्रॅकटर 590 /-
4  चारचाकी वाहने .( Four Wheeler Non -Transport) 879 /-
5  चारचाकी व्यवसायिक वाहने . ( Four Wheeler Transport ) 879 /-
6  अवजड मालवाहतूक वाहने. ( Goods Carriers ) 879 /-

 

 

how to get hsrp number plate in maharashtra | HSRP नंबर प्लेट खरेदीसाठी अर्ज कसा करावा.

HSRP नंबर प्लेट खरेदी करण्यसाठी तुम्हांला  https://transport.maharashtra.gov.in  या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. नंबर प्लेट ची अर्ज प्रक्रिया करण्यसाठी तुम्हांला वाहन नोंदणी प्रमाणपत्र  ( RC ) व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक चा वापर करावा लागेल. नोंदणी प्रक्रिया करताना तुम्हांला दोन पर्याय दिले जातील. पहिला म्हणजे तुम्ही ऑनलाइन अर्ज केल्यावर जवळच्या फिटमेंट सेटर वर जावून HSRP नंबर प्लेट बसवून घेवू शकता. किंवा अर्ज प्रक्रीये वेळी घरपोच सुविधा निवडून घर बसल्या आपल्या नंबर प्लेट मागवू शकता. Hsrp number plate for old vehicle maharashtra ( घरपोच फिटसाठी तुम्हांला अधिक रक्कम द्यावी लागेल )

 

वेबसाईट  https://transport.maharashtra.gov.in
संपर्क क्रमांक  1800 120 8040

 

Leave a Comment