How to repay loan faster : मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनात काही अडचणीमुळे कधीना-कधी पैशांची गरज भासते. मग आपण ते पैसे कोणाकडून उसने किंवा कर्ज स्वरुपात घेतो. आपल्यापैकी बहुतेक लोकांनी कर्ज देखील घेतलं असेल . पण होत आस कि पगार कमी असल्याने किंवा उत्पन्न कमी असल्याने कर्जाची रक्कम हि वाढतच जाते. आणि या कर्जाच्या जाळ्यात माणूस दिवसेन -दिवस डुबत जातो.
आज आपण या लेखाद्वारे लवकर कर्ज फेडण्याचे काही उपाय व पद्धती जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या जीवनात वापरल्यास कर्जमुक्त होण्यास मदत होवू शकते .
Types of loan | कर्जाचे प्रकार किती आहेत .
👇 मित्रांनो सर्वसाधारणपणे खालील दिलेले काही कर्जाचे प्रकार Types of loan आहेत जे सर्वधिक घेतले जातात. 👇
कर्ज प्रकार | पहिल्यांदा कोणाचे कर्ज फेडावे हे क्रमाने जाणून घ्या. |
1) दुसऱ्याकडून रक्कम 10% ,15%, महिना व्याजदराने घेणे. | ✅ 01 |
2) फायनान्स कंपनीकडून कर्ज घेणे | ✅ 02 |
3) पतसंस्था मधून कर्ज घेणे | ✅ 03 |
4) वैयक्तिक कर्ज घेणे | ✅ 04 |
5) बचत गट मधून कर्ज घेणे . | ✅ 05 |
6) व्यवसाय कर्ज घेणे . | ✅ 06 |
7) वाहन कर्ज घेणे . | ✅ 07 |
8) शेती किंवा जमीन वर कर्ज घेणे | ✅ 08 |
9) गृहकर्ज घेणे | ✅ 09 |
10) सोने तारण कर्ज घेणे . | ✅ 10 |
11) व्यवसायासाठी कॅश क्रेडीट (C.C) कर्ज घेणे . | ✅ 11 |
12) LIC किंवा इतर गुंतवणुकीतून कर्ज घेणे . | ✅ 12 |
👉वर दिल्याप्रमाणे जर तुम्ही एखाद्या क्रमांकाचे कर्ज घेतले नसेल तर तो क्रमांक वगळून त्यानंतर येणाऱ्या क्रमांकाच्या कर्जाची How to repay loan faster परतफेड आगोदर करा .
How to repay loan faster | कर्ज फेडण्यासाठी उपाय
✅ विनाकारण होणारा खर्च टाळा .
✅ जुन्या कर्जाची रक्कम भरण्यासाठी किंवा रक्कम चुकती करण्यासाठी नवीन कर्ज घेवू नका .
✅ नवीन काम शोधून उत्पनाचे स्त्रोत वाढवा .
✅ अनावश्यक व महागड्या वस्तू खरेदी करणे टाळा.
✅ पगार किंवा उत्पन्न यामधून येणाऱ्या रकमेतून सर्वात आधी कर्जाची रक्कम भरा .
✅ LIC पॉलिसि किंवा इतर गुंतवणुकीमधून रक्कम काढून सर्वात जास्त व्याजदर असलेले कर्ज फेडा .
✅ कर्जाची रक्कम पूर्ण भरे पर्यंत जास्त मेहनत घ्या .दुप्पट काम करण्याची तयारी ठेवा .
✅ शेती असेल तर थोडेशे ज्ञान घेवून मेहनत करून चांगले उत्पन्न काढून ती रक्कम कर्जात भरा .
😊वरील गोष्ठीचे काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास तुमचे कर्ज काही दिवसांतच (How to repay loan faster ) फेडू शकता आणि मनापसून खरच प्रयत्न केले तर लवकरच तुम्ही कर्जमुक्त व्हाल .
टीप : जर तुम्ही बँकेमधून किंवा फायनान्स कडून कर्ज घेतलेले असेल त्याचे EMI हप्ते वेळेवर भरा .अन्यथा तुमचा Cibil Score कायमचा खराब होवू शकतो .
हेही वाचा 3 लाख देणार सरकार आली सरकारची नवीन योजना. 👈

I am Marathi Blogger & Digital Creator ,website Developer and owner of sharras.com website. I am from Satara, Maharashtra.